Dream In Education, Your ultimate destination for Maha TET Urdu Medium ,MahaTET Urdu Medium, maha tet previous year paper,mahatet prepration guidance, mahatet paper 1 syllabus,mahatet paper 2 syllabus, CTET, MahaTET, Scholarship 4th.5th,7th,8th,CTET Preparation, NMMS and GK quizzes. Maha TET Prepration, MahaTET Urdu Previous Years Question Papers, Maha TET Urdu Medium Free Test Series, Achieve your academic goals with Scholar Dream today!
MahaTET Marathi November 2025 Paper Solution Practice Part-1
पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतशी पांढऱ्या चाफ्याची पानं गळून पडतात. वसंतपंचमीच्या आसपास ह्या झाडाची सगळी पानं गळून गेलेली असतात. झाड म्हणजे नुसता खराटा दिसतं. त्या खडखडीत फांद्यांतून दिसणारं निळं आभाळच अधिक बरं वाटतं. किंवा त्या निळ्या आभाळावर ह्या काळ्या करड्या रेषा मारलेल्या दिसतात. ओक्याबोक्या रेषा. पण ह्या रेषा अस्ताव्यस्त मात्र नसतात. त्या रेषांचा एक सुडौल आकार दिसतो. सुडौल पण अबोल. झाड असतं जिवंत; पण न हलणारं, न बोलणारं. सृष्टीत वसंत ऋतू पानाफुलांचं वैभव फुलवत असतो; पण पांढऱ्या चाफ्याचं झाड मात्र खंतावल्यासारखं दिसतं. वारा येतो आणि ह्याच्या अंगाशी खेळतो. पण एकही पान नसल्यानं पांढऱ्या चाफ्याचं झाड हाललं असं वाटतच नाही. सकाळी प्रसन्न अरुणोदय होतो; पण पांढऱ्या चाफ्याला कळ्या नसल्यानं हा हलल्यासारखा दिसत नाही. पावसाळ्यातलं ह्याचं ते हिरव्या गुच्छांचं हालणं-फुलणं आठवून तर आताचा त्याचा हा उदासीनपणा आपल्या मनाला खूपच खिन्न करतो.
No comments:
Post a Comment