दिनांक : १३/०६/२०१९
विषय : जिल्हांतर्गत बदली अर्ज व दस्तऐवजाबाबत.
आपणास कळविण्यात येते की, जिल्हांतर्गत बदली २०१९ मध्ये आपल्या अधिनिस्त ज्या शिक्षकानी ज्या संवर्गा मधुन बदली पोर्टलवर आपले बदली अर्ज संगणकीय केलेले आहेत त्या सर्व शिक्षकांचे बदली अर्ज व ज्या संवर्गातुन अर्ज केले आहेत त्या संवर्गाबाबत ची पुरावे/ दस्तावेज जमा करुन घ्यावेत व जिल्हा कार्यालय जेंव्हा मागणी करेल तेंव्हा जिल्हा कार्यालयास संवर्गनिहाय सादर करावेत
संवर्ग ०१ साठी : संवर्ग ०१ मध्ये केलेला अर्ज व संवर्ग १ मधील ज्या ज्या उपविभागामध्ये अर्ज केले आहेत त्या त्या उपविभागाबाबतची शासकीय पुरावे.
संवर्ग ०२ साठी : १) जोडीदाराचे कार्यरत प्रमाणपत्र २) जोडीदाराचा कायम आदेश ३) जोडीदाराच्या पदाच्या मान्यतेचे प्रमाणपत्र/ अपृव्हल ४) गुगल मॅप अंतर नकाशा ०५) पती पत्नी आसल्याचा पुरावा
संवर्ग ०३ साठी : १) बदली अर्ज व दुर्गम क्षेत्राची यादी २) महिलांसाठी घोषित केलेल्या प्रतिकुल शाळेतील महिलानी अर्ज केला आसेल तर महिलांसाठी प्रतिकुल घोषित केलेल्या शाळेची यादी
संवर्ग ०४ : १) बदली अर्ज २) संवर्ग ०४ मधील जि प शाळांतील एक युनिट म्हणुन अर्ज केला असेल तर अ)जोडीदाराचे कार्यरत प्रमाणपत्र ब) पती पत्नी आसल्याचा पुरावा क) दोघांच्या शाळेतील अंतराबाबत गुगल मॅप नकाशा
वरील सर्व पुरावे हे प्रथम जमा करुन घ्यावेत . याउपर आणखी काही पुरावे लागले तर अपणास कळविण्यात येतील तेंव्हा ती पुरावे जमा करुन घ्यावीत.
हे सर्व अर्ज व पुरावे दोन दिवसाच्या आत जमा करुन आपल्यास्तरावर संवर्गनिहाय वयक्तिक संचिका तयार करुन ठेवाव्यात.जिल्हा स्तरावरुन मागणी केल्याबरोबर जिल्हास्तरावर दाखल कराव्यात
No comments:
Post a Comment