२०१९ च्या शिक्षक जिल्हांतर्गत बदल्या
शासननिर्णय २७/०२/२०१७ व २८/०५/२०१९
जिल्हांतर्गत बदली २०१९ चे ट्रांसफर पोर्टल काही जिल्ह्यामध्ये चालु झाले आहे आणि बाकी जिल्हे चालु होण्याच्या अंतिम टप्प्यावर आहेत . परंतु अनेक शिक्षक बदल्याबाबत अद्यापही गोंधळातच आहेत . आपल्या मनात अनेक प्रश्न भेडसावताना दिसत आहेत .
२०१८ च्या बदल्यामध्ये मा प्रदिप भोसले सर यांच्या सुचनावजा मार्गदर्शनपर पोस्ट यायच्या म्हणुन आपणास सर्व बाबी स्पष्ट होत होत्या परंतु आता आपण चाचपडत आहोत म्हणुन आपणालाच माहिती मिळवावी लागत आहे . आपण आपल्या मनाप्रमाणे अर्थ काढताना दिसत आहोत आणि पुण्हा विस्थापित होतोत की काय ही भिती मनामध्ये निर्माण होत आहे .२७/०२/२०१७ मध्ये २८/०५/२०१९ च्या सुद्धारित धोरणाची भर पडली आहे आणि कळण्याच्या पलिकडे झाले आहे . या पोस्टद्वारे २७/०२/२०१७ चा शासननिर्णय काही शुद्धिपत्रके आणि विशेष २८/०५/२०१९ चे सुद्धारित धोरण याविषयी काही बाबी मी स्पष्ट करत आहे त्या बाबी समजुन घेवु शकता .
बदलीपात्र शिक्षक?
सुगम क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षक
दिनांक २७/०२/२०१७ च्या शासननिर्णयानुसार ३१/०५/२०१९ रोजी ज्या शिक्षकांची सुगम क्षेत्रातील सलग सेवा १० वर्ष पुर्ण झाली आहे आसे शिक्षक बदलीपात्र शिक्षक म्हणुन घोषित होत होत होते परंतु ०८/०३/२०१९ च्या शासननिर्णयानुसार सुगम क्षेत्रामध्ये सलग १० वर्ष आणि सध्याच्या शाळेमध्ये ३ वर्ष पुर्ण झाले आहेत आसे सर्व शिक्षक बदलीपात्र आहेत (१० वर्ष आणि ३ वर्ष या दोन्ही अटी पुर्ण करणारे ) . सुगम क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षकासाठी वरील दोनही अटी पुर्ण करणे बंधनकारक आहे आसेच शिक्षक बदलीपात्र आहेत . (बदलीनंतर ०३ वर्ष सेवेसाठी संगणकीय शब्दाचा काहीही संबंध नाही मग ती बदली ऑफलाइन आसो की समायोजनाने आसो . सुगम मधील सलग सेवा १० वर्ष आणि सध्याच्या शाळेत ३ वर्ष पुर्ण होणे बंधनकारकच आहे ) ( संदर्भ शासननिर्णय २७/०२/२०१७ व ०८/०३/२०१९ )
दुर्गम क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षक
दिनांक ३१/०५/२०१९ रोजी ज्या शिक्षकाची/ शिक्षिकेची सेवा दुर्गम क्षेत्रामध्ये ३ वर्ष पुर्ण झाली आहे आसे सर्व शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक आहेत . ०३ वर्ष सेवा झाल्यानंतर ते बदलीसाठी अर्जही करु शकतात . यांची १० वर्ष सेवा पुर्ण होइपर्यंत याना कोणीही खो देवु शकत नाही. बदली मागायची का नाही हे यांच्या मनावर आहे . यानी २० पसंतीक्रम भरुन याना एकाही शाळेत बदली मिळाली नाहीतर आसे शिक्षक त्याच शाळेत कार्यरत राहतील म्हणुन यांची बदली नाही झाली तरी त्याना कोणीही खो देवु शकत नाही . परंतु ज्या शिक्षकाची सेवा दुर्गममध्ये सलग १० वर्ष व सध्याच्या शाळेत ०३ वर्ष सेवा पुर्ण झाली आहे आणि सध्या ते त्याच शाळेत कार्यरत आहेत ते शिक्षक बदलीपात्र आसतात त्याना सेवाजेस्ठ शिक्षक खो देवु शकतो. (संदर्भ शासननिर्णय २७/०२/२०१७ )
महिलांसाठी प्रतिकुल दुर्गम क्षेत्रातील सेवा
ज्या शाळा महिलांसाठी प्रतिकुल घोषित केलेल्या आहेत त्या शाळेतील महिला त्या शाळेत ३ वर्ष पुर्ण होइपर्यंत बदलीअधिकार प्राप्त शिक्षिका म्हणुन घोषीत होत नसतात तरीपन बदलीसाठी अर्ज करु शकतात . त्याना दुर्गममधील ३ वर्ष सेवेची कोणतीही अट नाही ते बदलीस पात्र आहेत . बदली करुन घ्यावयाची का नाही हे त्यांच्या मनावर आहे . त्यांची त्या क्षेत्रामध्ये १० वर्ष सेवा होइपर्यंत त्याना कोणीही खो देवु शकत नाही . परंतु ती शाळा महिलांसाठी प्रतिकुल म्हणुन घोषीत केलेली पाहिजे .( संदर्भ शासननिर्णय १५/०२/२०१८)
संवर्ग -०१
शासन निर्णय २७/०२/२०१७ व दिनांक २८/०५/२०१९ च्या शासन निर्णयातील संवर्ग ०१ चे नियम / अटी व शर्ती पुर्ण करतात आसे शिक्षक संवर्ग ०१ मध्ये मोडतात . याना बदली मागण्यासाठी बदलीपात्र शिक्षकाची सेवेची कोणतीही अट नाही . गत वर्षी जरी बदली झाली आसली तरी किंवा २०१८ च्या बदलीनंतर नविन निर्माण झाले आसले तरी ते यावर्षी सुद्धा बदलीसाठी अर्ज करु शकतात . मे २०१८ च्या बदलीमध्ये नकार दिलेले , बदली झालेले व नविन निर्माण झालेले संवर्ग ०१ मधील शिक्षक बदलीसाठी अर्ज करु शकतात . (संदर्भ शासनिर्णय २७/०२/२०१७, २१/०२/२०१९ व २८/०५/२०१९ )
शासननिर्णयानुसार जे शिक्षक संवर्ग ०१ साठी पात्र आहेत ते शिक्षक बदलीसाठी अर्ज करु शकतात . संवर्ग ०१ मध्ये पुर्वीपासुन आहेत आणि नव्याने निर्माण झाले आहेत आसे सर्व शिक्षक बदलीसाठी अर्ज करु शकतात .संवर्ग ०१ मधील जे शिक्षक सलग सेवेचे १० वर्ष आणि सध्याच्या शाळेत ३ वर्ष सेवेची अट या दोन्ही अटी पुर्ण करतात असे शिक्षक बदलीपात्र यादीमध्ये येत आसतात . या दोन अटी पुर्ण न करणारे शिक्षक बदलीपात्र यादीमध्ये येत नसतात परंतु बदलीसाठी अर्ज करु शकतात . शाळांचा पसंतीक्रम भरताना मात्र काळजीपुर्वक भरावा .संवर्ग ०१ मध्ये येणार्या शिक्षकाने बदलीसाठी अर्ज करुनही जर आपली बदली झाली नाहीतर आपण सध्याच्या शाळेतच कार्यरत राहतोत . (संदर्भ शासनिर्णय २७/०२/२०१७ व २१/०२/२०१९)
संवर्ग ०२
शासन निर्णय दिनांक २७/०२/२०१७ व २८/०५/२०१९ च्या शासन निर्णयातील संवर्ग २ च्या अटीशर्ती व नियमाची पुर्तता करतात आसे शिक्षक संवर्ग २ मध्ये येतात . तसेच त्यातील ज्या पती- पत्नी शिक्षकाच्या कार्यरत शाळेतील किंवा कार्यालयातील अंतर ३० किमीपेक्षा जास्त आहे , आसे शिक्षक संवर्ग ०२ च्या लाभासाठी पात्र आसतात . ( लक्षात घ्या ३० किमी सुद्धा जमत नाही . ३० किमी पेक्षा जास्त अंतर असले तरच अंतरासाठी पात्र ठरत आसतात ) . संवर्ग ०२ साठी बदलीपात्र शिक्षकाची सलग सेवेची १० वर्ष आणि सध्याच्या शाळेतील ०३ वर्ष सेवेची अट लागु नाही. संवर्ग ०२ च्या नियमात जे येतात ते बदलीसाठी अर्ज करु शकतात . ( संदर्भ शासननिर्णय २७/०२/२०१७ व २८/०५/२०१९)
संवर्ग ०२ मधील जे शिक्षक सलग सेवेचे १० वर्ष आणि सध्याच्या शाळेत ३ वर्ष सेवेची अट या दोन्ही अटी पुर्ण करतात असे शिक्षक बदलीपात्र यादीमध्ये येत आसतात . या दोन अटी पुर्ण न करणारे शिक्षक बदलीपात्र यादीमध्ये येत नसतातपरंतु २८/०५/२०१९ च्या नियमात येणारे शिक्षक बदलीसाठी अर्ज करु शकतात.
मे/जुन २०१८ मध्ये ज्या शिक्षकांची बदली संवर्ग ०२ मध्ये झालेली आहे अशा दोघा जोडीदारापैकी एकाने सुट घेतली होती म्हणजे ते लॉक झाले होते आसे लॉक झालेले जोडीदार शिक्षक सलग सेवेची १० वर्ष पुर्ण करत आसतील आणि सध्याच्या शाळेत ०३ वर्ष पुर्ण करत आसतील तर असे शिक्षक बदलीपात्र आसतात व त्यांचे नाव बदलीपात्र यादीमध्ये येत आसते . शासननिर्णयातील तरतुदीनुसार एकदा बदली झाल्यानंतर ०३ वर्ष बदलीस पात्र नाही या अटीनुसार ज्या पती- पत्नी शिक्षकापैकी एकाची बदली झाली आणि त्या बदली झालेल्या शिक्षकाने आपल्या जोडीदाचा आयडी टाकुन त्यास लॉक केले होते त्यानुसार दोघानाही ०३ वर्ष्यापर्यंत लॉक केले जाइल का नाही ही बाब अद्याप जरी स्पस्ट झाली नसली परंतु शासननिर्णयातील एक एकक युनिट नुसार सुट घेतलेल्या बदलीपात्र जोडीदारास खो मिळाला तर शासननिर्णय २७/०२/२०१७ नुसार दोघानाही एक एकक युनिट म्हणुन बदलीने जिल्ह्यातील कोणत्याही एकाच शाळेत किंवा ३० किमीच्या परिघातील शाळेत पदस्थापना देण्याची तरतुद आहे .त्याप्रमाणे बदली होवु शकते .
२८/०५/२०१९ विशेष
शासननिर्णय २८/०५/२०१९ नुसार शासननिर्णय २७/०२/२०१७ मधील संवर्ग ०१ मध्ये (अं) हा भाग दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शिक्षकाचा जोडीदार अं मधील ०१ ते ०५ अजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक संवर्ग ०१ मध्ये आणले आहेत . त्यांचा जोडीदार (अं) मधील अजारामध्ये येत आसेल तर अशा शिक्षकास संवर्ग ०१ चा दर्जा दिला आहे . असे शिक्षक बदलीसाठी अर्ज करु शकतात .
संवर्ग ०२
शासननिर्णय २७/०२/२०१७ ,२१/०२/२०१७ व २८/०५/२०१९ नुसार खालील बाबी स्पष्ट होतात .
शासन निर्णय २७/०२/२०१७ नुसार बदलीसाठी जोडीदारापैकी कोणीही एकजण अर्ज करत होता व आपल्या जोडीदारास लॉक करत होता . २१/०२/२०१७ नुसार संवर्ग ०२ ला सेवेची अट नाही . परंतु शासननिर्णय २८/०५/२०१९ नुसार खालील बदल झालेले आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकाचा किंवा शिक्षीकेचा जोडीदार जिल्हापरिषद प्राथमिक शिक्षक वगळता इतर कोणत्याही विभागामध्ये ३० की पेक्षा जास्त अंतरावर २७/०२/२०१७ च्या शासननिर्णयातील सेवेच्या अटी पुर्ण करणारा जोडीदार सेवेत कार्यरत आसेल तर जिल्हा परिषदेतील शिक्षक बदलीसाठी अर्ज करु शकतात .त्याना सेवेची अट नाही .
जर आपणास संवर्ग २ चा लाभ घ्यावयाचा आसेल तर दिनांक २८/०५/२०१९ च्या शासननिर्णयातील २ मध्ये नमुद केल्याप्रमाणे पती- पत्नी दोघेही जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक आसल्यास व २७/०२/२०१७ च्या नियमानुसार ज्यांच्या कार्यालयातील अंतर ३० किमी पेक्षा जास्त आसल्यास २८/०५/ २०१९ मधिल नियम क्रमांक २ (अ) नुसार दोघापैकी एकही शिक्षक बदलीपात्र नसल्यास अथवा दोघेही बदलीपात्र शिक्षक आसल्यास ज्या जोडीदाराचा त्याच्या सध्याच्या कार्यरत शाळेतील सेवा जास्त आहे अशा जोडीदाराने बदलीसाठी फॉर्म भरावा . पती पत्नी यांचा सध्या शाळेवरील सेवा कालावधी सारखाच आसल्यास त्या दोघापैकी इछुक आसेल अशा एकानेच बदली अर्ज करावा .
(ब) पती पत्नी या दोघापैकी एकच शिक्षक बदलीपात्र आसल्यास , जो शिक्षक बदलीपात्र आहे त्याच शिक्षकाने पती पत्नी एकत्रीकरणांतर्गत अर्ज करावा . याना ( २ अ) लागु होत नाही .
वरील २ मधी अ व ब नुसार ३० किमीच्या आत जोडीदाराची बदली झाली नसल्यास संवर्ग टप्पा क्रमांक ०३ व ०४ च्या बदल्या झाल्यानंतर ,राबवण्यात येणार्या समुपदेशनामध्ये मा मुख्यकार्यकारी अधिकारी आपणास ३० किमीच्या आत पदस्थापना देण्याचा अंतिम प्रयत्न करतील तसा मा मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब यांच्याकडे आपणास अर्ज करावा लागेल .
३) दिनांक २७/०२/२०१७ च्या शसन निर्णयासोबतच्या विवरणत्र ०४ ( विशेष संवर्ग शिक्षक भाग २) येथे अनुक्रमांक ११ मध्ये बदल केलेला आहे तो २८/०५/२०१९;च्या शासननिर्णयामध्ये वाचावा. ५ प्रकारचे विवरण पत्र दिलेले आहेत त्याचे वाचण करावे म्हणजे आपण कोणत्या नियमात येतोत हे लक्षात येण्यास मदत होइल .
४) मे २०१८ मध्ये जे शिक्षक विस्थापित व रॅंडम राउंडमध्ये गेले होते ती पद्धती आता बंद करण्यात आलेली आहे . म्हणजे टप्पा क्रमांक ०५ व ०६ बंद करण्यात आलेला आहे त्याऐवजी या टप्प्यात येणार्या शिक्षकांच्या बदल्या समुपदेशनाने मा मुख्य कार्यकारी अधिकारी करतील .
४ (३) २०१९ च्या बदल्यातील चार टप्पयाच्या बदल्या झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागा ' अ' म्हणुन म्हणुन तयार होतील व विस्थापित झालेले शिक्षक 'ब' या यादीमध्ये येतील .
४(४) सन २०१८ मध्ये कोकण वगळुन इतर जिल्ह्यात झालेल्या बदल्यामधील टप्पा क्रमांक ०५ व ०६ मधील शिक्षक व २०१९ मध्ये कोकणातील जिल्ह्यामधील बदलीतील टप्पा क्रमांक ०५ व ०६ मध्ये बदली झालेल्या शिक्षकांस बदली हवी आसल्यास ते मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याअडे अर्ज करु शकतात व बदली मागु शकतात .टप्पा क्रमांक ०५ व ०६ मधील बदलीसाठी अर्ज करणार्या शिक्षका ची जागा त्वरीत रिक्त केली जाइल आणि समुपदेशनातील इतर शिक्षकाना दाखवली जाइल . २०१९ च्या चार टप्प्याच्या बदल्या झाल्यानंतर ही समुपदेशनाची प्रक्रिया राबवली जाणार आहे हे लक्षात घ्यावे . समुपदेशन करताना काही नियमावली व प्राहान्यक्रम ठरलेला आहे तो पन लक्षात घ्यावा
५) तसेच बदलीसाठी अर्ज केले शिक्षक ब यादीमध्ये व त्यांच्या रिक्त जागा अ मधुए समाविष्ट करतील
१) न्यायालयीन आदेशानुसार विचार करावयाच्या शिक्षकांची नावे अ मध्ये
२) सध्याच्या बदलीमध्ये जे पती पत्नी पैकी एक जोडीदार ३० किमी पेक्षा जास्त अंतरावर पदस्थापना मिळाली आहे आसे जोडीदार किंवा दोघांचीही बदली ३० किमी पेक्षा जास्त झाली आहे आसे जोडीदार , दोघापैकी एकाची बदली झाली आसल्यास व एकाची झाली नसल्यास , ज्याची झाली नाही आशाने अर्ज करावयाचा आहे . ते पन अ मध्ये येतील .
३) आंतरजिल्हा बदलीने रुजु झालेल्या शिक्षकांची नावे .
६) समुपदेशनातील ब मध्ये समाविष्ट आसलेल्या समुपदेशन होताना मा न्यायालयाचे आदेश आसतील अशा शिक्षकाना प्रथम प्राधान्य आसेल .
७) त्यानंतर ब मधील महिलाना सेवाज्येष्ठतेने प्राधान्य आसेल .
८) यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार ब यादीतील पुरुषाना प्राधान्य आसेल .
९) समानिकरणंच्या जागावर समुपदेशनाने पदस्थापना मिळणार नाही .
५) बदलीसंदर्भामध्ये तक्रार आसेल तर
१) बदलीमध्ये अन्याय झाल्यास मा मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे ७ दिवसाच्या आत अर्ज करावा . आपणास ३० दिवसाच्या आत निर्णय मिळेल .
२) मा मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या निर्णयावर आपण समाधानी नससाल तर हा निर्णय लागल्याच्या ७ दिवसाच्या आत विभागिय आयुक्तालयाकडे तक्रार दाखल करता येणार आहे . ३० दिवसांच्या आत आपणास निर्णय मिळेल आणि हा निर्णय अंतिम राहिल .
३) बदली आदेशांच्या विरोधामध्ये अपिलीय प्रक्रिया सुरु आसताना आपणास शैक्षणिक कार्य करावे लागणार आहे .
६) सदर बदली प्रक्रियेमध्ये चार टप्पे होतील व ते एकाच वेळी सुरि होतील , एकाच वेळी आदेश निर्गमित होतील त्यानंतर उर्वरित शिक्षकाना समुपदेशनाने आदेश निर्गमित होतील .
संवर्ग ०१ ते ४ चे बदली पोर्टल सुरु आहे .आपण ज्या संवर्गामध्ये आहोत त्या संवर्गामधुन आपला बदली फॉर्म ऑनलाईन करावा . आपण ज्या संवर्गामध्ये येतोत त्या संवर्गाची सर्व पुरावे जोडुन ठेवावेत .
बदलीपात्र शिक्षकाच्या जागा संवर्ग ०१,०२,०३ मधील शिक्षक मागु शकतात व संवर्ग ०४ मधील सेवाज्येष्ठ बदलीपात्र शिक्षक सेवाकनिस्ठ बदलीपात्र शिक्षकाच्या जागा मागु शकतात .संवर्ग ०१,०२,०३,०४ मधील शिक्षक रिक्त जागेच्या शाळा सुद्धा मागु शकतात
संवर्ग ०१,०२ मध्ये येणारे शिक्षक सलग सेवेची १० वर्ष व सध्याची ०३ वर्ष या दोन्ही अटी पुर्ण करणारे शिक्षक बदलीपात्र यादीमध्ये येत आसतात व या दोन्ही अटी पुर्ण न करणारे शिक्षक बदलीपात्र यादीमध्ये येत नसतात परंतु बदली हवी आसल्यास दिनांक २१/०२/२०१९ व २८/०५/२०१९ च्या शासननिर्णयातील तरतुदीमधील अटी पुर्ण करणारे शिक्षक बदलीसाठी अर्ज करु शकतात .
संवर्ग ०३ च्या अटी पुर्ण करणारे शिक्षक/शिक्षिका बदलीसाठी अर्ज करु शकतात परंतु त्याना १० वर्ष पुर्ण झाल्याशिवाय कोणीही खो देवु शकत नाही.
महिलांसाठी प्रतिकुल घोषीत केलेल्या शाळेत सध्या कार्यरत आसलेल्या महिला शिक्षिका बदली हवी आसल्यास बदलीसाठी अर्ज करु शकतात परंतु त्याना १० वर्ष पुर्ण झाल्याशिवाय कोणीही खो देवु शकत नाही
संवर्ग ०३ मध्ये म्हणजेच दुर्गम क्षेत्रामध्ये सध्या कार्यरत आसलेले परंतु सध्या संवर्ग ०१,०२ च्या नियमात येणारे शिक्षक त्या त्या संवर्गातुन बदलीसाठी अर्ज करु शकतात त्यासाठी संवर्ग ०१,०२ चे बदली अर्ज करु शकतात . संवर्ग ०३ मध्ये कार्यरत आसलेल्या शिक्षकाना संवर्ग ०१ व ०२ मध्ये पात्र आसणार्या शिक्षकाना बदलीसाठी अर्ज करता येइल
संवर्गनिहाय याद्या तयार करण्याची कोणतीही अधिसुचना नाही आणि तशा याद्या घोषित केल्यामुळे काहीही लाभ होणार नाही कारण संवर्ग ०१ मधील शिक्षक बदली मागेल किंवा सुट घेइल हे आपणास माहित नसते . संवर्ग ०२ मधील कोणता जोडीदार बदली मागेल हे निस्चित नसते .संवर्ग ०३ मधील शिक्षक बदली मागेल किंवा सुट घेइल हेही निश्चित नसते म्हणुन संवर्गनिहाय याद्या प्रसिद्ध करण्याचा काहीही लाभ होणार नाही .
आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये जे शिक्षक सध्या कार्यरत आहेत आणि ज्याना या शाळेत काम करावयाचे आहे आसे लिहुन दिले आहे त्यांची बदली होणार नाही व ज्यानी आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये काम करावयाचे नाही आसे लिहुन दिले आहे त्यांची बदली होणार आहे त्यांची मॅपींग केली गेली आहे.
बदली प्रक्रिया सुरु होत आसल्यामुळे आपल्या शाळेचे स्टाफ पोर्टल ओपन करुन पहावे . आपले नाव स्टाफ पोर्टलला आहे की नाही हे पहावे . जर नसेल तर वरिष्ठ कार्यालयास कळवावे .
कोणत्याही चुकीच्या माहितीच्या अधारे / खोटे कागपत्राच्या अधारे बदलीचा लाभ घेवु नये .नाहीतर २८/०६/२०१८ च्या शासननिर्णयानुसार कार्यवाही होते .
धन्यवाद ....
No comments:
Post a Comment