संचमान्यता अत्यंत महत्त्वाचे
सन २०१८-१९ च्या संच मान्यता दिनांक ३०/०९/२०१८ रोजी Student पोर्टल मध्ये असलेल्या विद्यार्थी पट संख्येच्या आधारे करण्याची सूचना यापूर्वी देण्यात आलेली होती.परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर सूचनेत बदल केलेला असून सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सूचित करण्यात येते की,सन
२०१८-१९ या वर्षीच्या संच मान्यता साठी दिनांक ०४/१०/२०१८ रोजी सायं ५:०० वाजता Student पोर्टल मधील शाळेची पट संख्या विचारात घेऊन संच मान्यता केली जाणार आहे,याची नोंद घ्यावी.तरी ज्या शाळांचे student पोर्टल मधील काम अपूर्ण असेल अशा शाळांनी दिलेल्या मुदतीत आपले काम पूर्ण करून घ्यावे. सन २०१८-१९ च्या संच मान्यता च्या कामाचे वेळापत्रक खालील प्रमाणे देण्यात येत आहे.
*१) शाळा लॉगिन मधून केंद्र प्रमुख लॉगिन ला विद्यार्थी माहिती फॉरवर्ड करणे : दिनांक ०४/१०/२०१८ ते दिनांक १५/१०/२०१८
*२) केंद्र प्रमुख लॉगिन मधून शाळेने पाठविलेली विद्यार्थी माहिती अंतिम करणे : दिनांक ०४/१०/२०१८ ते दिनांक १८/१०/२०१८
No comments:
Post a Comment